ठरलं! राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्याचं हस्ते होणार

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाला आगस्ट महिन्यातील २ तारखा पाठवल्या होत्या.मात्र, या दोन्ही तारखांबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अजून उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असल्याचे निश्चित … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

TiK ToKची सुट्टी केल्यानंतर मोदींनी देशातील युवकांना दिलं ‘अ‍ॅप चॅलेन्ज’, म्हणाले..

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने TiK ToKसह चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत देशातील युवकांना हे चॅलेन्ज दिले आहे. ज्यांच्याकडे आयडिया असतील त्यांनी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more

गलवान खोऱ्यातील जखमी जवानांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

लेह । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह दौऱ्यावर आहेत. भारत-चीन सीमेवर तैनात जवानांशी संवाद साधल्यानंतर ते गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत जखमी झालेल्या जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले. लेहमधील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या जवानांना पंतप्रधान मोदींनी येवेळी संबोधित केलं. ‘आपल्यासोबत आज नाहीत ते खूपच शूर होते. त्यांनी योग्य प्रत्यूत्तर दिलं. तुमचं रक्त … Read more

पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये भेट दिल्याने चीनचा जळफळाट, म्हणाला..

वृत्तसंस्था । चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लडाख भेटीवर नाराजीचा सूर लावला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढणारं पाऊल उचलू नये,” असं मत चीनच्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी व्यक्त केलं … Read more

विस्तारवादाचे युग संपले, हे युग विकासवादाचे आहे; मोदींचा नाव न घेता चीनला टोला

लेह । आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. असे सांगतानाच विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी लडाख दौऱ्यावर असून त्यांनी लेहमधील … Read more

पंतप्रधान मोदींची लडाखला ‘सप्राइज व्हिजीट’; सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा घेतला आढावा

लेह । लडाखमधील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सर लष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

मुंबई । कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशावासियांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे ८० कोटी नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ तसेच १ किलो चणा डाळ प्रतिमाह मोफत मिळणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

८० कोटी देशवासीयांना नोव्हेंबरपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्न- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत इतरांनाही दिलासा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. दिवाळीअखेरपर्यंत देशातील कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. PM Gareeb Kalyan Anna Yojana … Read more