सोलापूरातील ७१ हजार ९०४ कामगारांच्या खात्यात १४ कोटी रुपये जमा

सोलापूर प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांचा उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या तसेच नूतनीकरण केलेल्या व सक्रिय असलेल्या कामगारांना दोन हजार रुपयाची मदत जाहीर केली. याचा लाभ जिल्ह्यातील 71904 कामगारांना मिळाला असून त्यांच्या खात्यात 14 कोटी 38 लाख … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more

Budget2020Live: अर्थमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; बँक बुडाली तर ५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांमध्ये वाढत्या फसवणूकीच्या प्रकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँक प्रकरणानंतर एका गोष्टीची सर्वात मोठी चिंता अशी होती की जर एखादी बँक बुडली तर बँक खातेदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळं बँक खातेधारकांच्या खात्याचे रक्षण करण्यासाठी ठेव विमा १ लाख रुपये होता. अर्थमंत्र्यांनी आपल्या … Read more

खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईसाठी सर्वाधिक रिक्त पदे

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ जागा शैक्षणिक पात्रता … Read more

जिल्हा बँक नोकरभरतीचा कारभार अपारदर्शक?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली चारशे जागांसाठीची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. येत्या सात दिवसात बँकेने ही प्रक्रिया रद्द करावी. तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत शिंदे म्हणाले, बँकेने ज्युनिअर अससिस्टंट … Read more

खूशखबर! ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना मिळणार पेन्शन, उपराज्यपालांची घोषणा

दिल्ली | जेष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंगांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग लोकांच्या पेन्शनच्या एक लाखाहून अधिक प्रकरणांना मंजुरी दिली आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रलंबित पेंशनच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाज कल्याण विभाग … Read more

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

मुंबई प्रतिनिधी । आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे … Read more