सतेज पाटलांना मंत्रिपद मिळाल्यानं पी एन पाटील गटाने लावला नाराजीचा सूर

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी एन पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांने मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात टाकली. यामुळं पीएन समर्थक नाराज आहेत.

प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

महाविकासआघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक जातीपातीच राजकारण करून डावलण्यात आलं असा आरोप प्रणिती शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असूनही याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली नाही.

नवनिर्वाचित राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे पाटण मतदारसंघात अभुतपूर्व स्वागत

महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले नामदार शंभुराज देसाई हे आज प्रथमच पाटण मतदार संघात आले. यावेळी कराड-चिपळूण मार्गावर मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे प्रत्येक गावात स्वागत कमानी लावुन स्वागत केलं. गावातील सुवासिनींनी ठिकठिकाणी देसाई यांचे औक्षण केलं. युवक मंडळ संस्थांनी देसाई यांची उत्साहानं यावेळी वहीतुला केली.

बाळासाहेब पाटलांच्या मंत्रीपदाचा साताऱ्यात जल्लोष

ज्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कराडमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाविकासआघाडीचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती. त्यानुसार आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात संपन्न झाला. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह ७ जणांचा समावेश करण्यात आला होता. तर आजच्या विस्तारात ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये २६ जणांची वर्णी कॅबिनेटपदी लागली तर १० जणांना राज्यमंत्रीपद मिळाले.

आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश

मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना … Read more

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीला धारेवर धरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नात्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच … Read more

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता बदलाचे संकेत; महाविकासआघाडीने सत्तेसाठी कंबर कसली

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधला. ‘राज्यामध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या सरकारची स्थापना झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आकाराला येईल. शिवसेनेचे दहा सदस्य दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत येतील,’ असेही आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. सदस्यांना भेटण्याअगोदर मुश्रीफ व पाटील यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सदस्यांशी संवाद साधला.