‘ती’च्या नकाराला सिरीयस न घेता, फालतु रोमँटिकपणा बॉलिवूड का दाखवतं??
त्रास देणं ही साधी कृती नाही, ही गुंतागुंतीची एक मानसिक प्रवृत्ती आहे, जी सामाजिक पैलू आणि घटकांमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच फक्त त्रास देणारा व्यक्ती नाही तर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवं.