पक्षाच्या विभागीय बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित, भाजपसोबत बिनसल्याच्या चर्चेला उधाण

भाजपच्या बैठकीचे निमंत्रण असुन देखील पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होत. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं भाजपशी बिनसल्याची चिन्हे त्यांच्या वागण्यातून दिसत आहे.

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असून उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सत्तास्थापनेचा खेळ अनेक दिवस रंगल्यामुळे अजित पवार त्रस्त असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आवश्यक असेल तर गनिमी कावा करा पण जनतेचं हित बघा ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला असून आम्हीही त्याप्रमाणेच … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार ?

सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेना यांच्यात अजूनही दिलजमाई झालेली नाही आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर आपला दावा सोडायला तयार होताना दिसत नाही. तर भाजपा एक पाऊल मागे येऊन शिवसेनेच्या मागणीला दाद देतांना दिसत नाही आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रकांत पाटलांनी बजावली तरुणीला अब्रुनुकसानीची नोटीस

कोल्हापुरातील एका तरुणीला अब्रुनुकसानीचा नोटीस ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बजावली आहे. ‘महायुती’ला कोल्हापूरकरांनी नाकारल्यानंतर ‘कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत’ अशा उल्लेखाची प्रेस नोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी जरी सारवा सारव केली असली तरी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या होत्या.

‘अब की बार २५० टच !’ – चंद्रकांत पाटील

‘भाजपा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयाच्या ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चर्चेसाठी येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारांच्या द्वारे केलं होतं.

‘अन्यथा भाजपाकडे काम घेऊन येऊ नका’, चंद्रकांत पाटील यांचा खा.संजय मंडलिकांना दम

”आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा. अन्यथा भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका” असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

‘पवारांना हा पाटील कोण आहे अजून ओळखता आला नाही’ – चंद्रकांत पाटील

‘शरद पवारांना पाटील अजून ओळखताच आला नाही. त्यामुळे पवारांनी मला कोथरूडला अडकवून ठेवण्यात यश आल्याचं म्हणत बसू नये. चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून माझ्या डोक्यात काय सुरू हे तुम्हाला कळणार नाही. माझ्या फटक्याचे तुम्ही इतके अनुभव घेतले आहेत की त्यांच्यात आता उत्साह राहिला नाही,’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.