मुंबईत कोरोनाचा हैदोस; कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ३ हजाराच्या घरात जाईल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी येत्या ४ दिवसात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा … Read more

कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी

औरंगाबाद  । राज्यावर सध्या करोनाचं संकट आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. औरंगाबादमध्ये ‘सारी’चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

राज्यात एकाच दिवसात आढळले १६२ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला ‘इतका’

वृत्तसंस्था । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. धक्कदायक बाब म्हणजे मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांनंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील … Read more

Breaking | पुण्यात २४ तासात कोरोनानाने घेतला ८ जणांचा बळी

पुणे । राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. मृतांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात पुण्यात ८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसोबत आता पुण्यात मृतांचा आकडा १६वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार … Read more

मोंदींसोबतच्या बैठकीत सेना-राष्ट्रवादीनं केली राज्यपालांची तक्रार

मुंबई । देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या … Read more

मुंबईत विना मास्क बाहेर पडल्यास, आता गुन्हा दाखल होणार

मुंबई । करोनाचा शहरातील वाढता संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मुबंईत मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता विना मास्क घराबाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही … Read more

‘मास्क’चा वापर करा, पण छत्रीसारखा करू नका! मुख्यमंत्री

मुंबई । करोनाचा विषाणू कधी, कसा, कुठून हल्ला करतोय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतानाही मास्क वापरा. मात्र, त्याचा वापर छत्रीसारखा सामूहिक करू नका. प्रत्येकासाठी स्वतंत्र मास्क ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद … Read more

देशातील अर्धे जिल्हे कोरोनाग्रस्त, ‘ही’ १० ठिकाणे बनलेत कोरोना हॉटस्पॉट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ६ एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पसरला आहे. बहुतेक प्रकरणे हि मुंबई आणि नवी दिल्लीसह देशातील सर्वाधिक प्रभावित १० जिल्ह्यांमधील आहेत.इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिट (डीआययू) ला आढळले की ६ एप्रिल पर्यंत देशातील एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी कोरोना विषाणू ३३० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. भारतात कोविड -१९च्या संसर्गाची पुष्टी झालेल्या … Read more

कोरोनाशी लढताना मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ आरोग्य सल्ला

मुंबई । महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. निर्णय घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली घरी बसून गैरसोय होतेय, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तणावमुक्त कसं राहता येईल याकडे लक्ष द्या. वाहिन्यांना विनंती की पॉझिटिव्ह कार्यक्रम अधिकाधिक दाखवा. तसंच नागरिकांनी घरात बसून व्यायाम करावा. … Read more