कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

खुशखबर ! इस्रायलने कोरोना लस बनवल्याचा केला दावा, आता शरीरातच नष्ट होणार कोरोनाचा विषाणू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्त्राईलने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोनाव्हायरसवरची लस तयार केली असून ती लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. इस्त्रायली संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी याविषयी सांगितले की आमच्या डिफेन्स बायोलॉजिकल संस्थेने कोरोना विषाणूवरची लस बनविली आहे. बेनेट यांच्या म्हणण्यानुसार,या संस्थेने कोरोना विषाणूच्या एंटीबॉडीज तयार केल्या आहेत.इस्त्राईलचा असा दावा आहे की ही … Read more

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

सरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.

चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील … Read more

जपानमध्ये आणीबाणीचा कालावधी ‘मे’च्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या आणीबाणीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा संदर्भ देताना अ‍ॅबे म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण होणाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाहीये आणि रूग्णालयात अजूनही क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण आहेत म्हणून सद्यस्तिथीत ही आणीबाणी सुरु राहिली पाहिजे.ते … Read more

रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की … Read more

राज्यात ३१ मेपर्यंत ग्रीन झोनची संख्या वाढलीच पाहिजे; मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना

मुंबई । राज्याचे अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे नेता येईल हे पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा … Read more

‘या’ राज्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

कोलकाता । देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत आहे. असे असले तरी मृत्यूचा दर काही प्रमाणात कमी होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून या राज्यातील मृत्यूचा दर देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पश्चिम बंगाल राज्यात मृत्यूदर १२.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारची केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या हे निदर्शनास आले … Read more

नवीन भानगड! आफ्रिकी स्वाइन फ्लूने आसाममध्ये २,५०० डुकरांचा मृत्यू

गुवाहाटी । संपूर्ण देशाला कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. देश ठप्प आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरात कोंडून आहेत. लॉकडाउन आणि अर्थचक्रही मंदावलं हे सर्व एका विषाणूमुळे घडत आहे. दरम्यान आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. भारतात आता आफ्रिकी स्वाइन फ्लू दाखल झाला आहे. .या आजारामुळे आसाममधील ३०६ गावातील २ हजार ५००हून अधिक डुकरांचा मृत्यू … Read more

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात करोना फैलाव अद्यापही थांबलेला नाही. देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा चिंताजनक वातावरणात एक एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत ११ हजार ७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०७४ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर … Read more