शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला ‘हा’ आरोप

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी पक्षाचा काहीही संबंध नसून राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही असं विधान शरद पवार यांनी शिवसेनेसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचं एकूण संख्याबळ १७० च्या आसपास असून पक्षांतरबंदी कायदा लागू केल्यानंतर फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचंही शरद पवार … Read more

आम्हाला ‘हे’ आधीच माहिती होतं, शिवेंद्रराजेंची अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रतिक्रीया

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आज शनिवारी मोठा राजकीय भूकंप झालाय. एकीकडे महाविकास आघाडीची टप्प्यात येऊन आज मुख्यमंत्री जाहीर होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, राज्यपालांनी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपत दिलीये. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय.

परंतु या घटनेची पूर्व कल्पना भाजपच्या अनेक नेतेमंडळींना होती. असे संकेत मिळत आहेत. राज्यात झालेल्या सत्ताकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना
सातारा जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं कि, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला विश्वास दिला होता की, काहीही झालं तरी सरकार भाजपचेच येणार आहे. आणि आता झाले असून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

सत्ता स्थापनेवर शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया, भाजपचेच सरकार येणार हे माहित होतं

इतर महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा! आता काय करणार?

राज्यात सत्ता कोणाची हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असल्याचे सांगत आहे. दरम्यान सत्तास्थापनेसाठी थोडाच अवधी उरला असताना मुख्यमंत्री राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना आपला राजीनामा सादर केला. यावेळी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.