भर अधिवेशनात गिरीश महाजनांची लागली डुलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास दि. ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यांवरून खंडाजगी होत आहार. दरम्यान अधिवेशात मंगळवारी चक्क भाजपच्या एका आमदाराची डुलकी लागल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या … Read more

“गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकासोबत जेवणं केलेय”

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 5 लाख रुपये दिले असल्याने याची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नेते गिरीश महाजन याच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल … Read more

गिरीश महाजनांनी भाजपला विकले; एकनाथ खडसेंनी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या एकमेकांवर अनेक गंभीर आरोप, टीका टिप्पणी केली जात आहे. महाजन यांच्या टीकेला खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत … Read more

गिरिश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवायला हवं – एकनाथ खडसे

Khadase mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याच दरम्यान, एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं … Read more

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजनांचा खडसेंच्या टीकेला पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे भाजप व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचे वक्तव्य करीत टीका केली. त्यावर महाजन यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलं आहे. त्यामुळे ते वाट्टेल तसं बरळत आहेत, … Read more

हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पे कभी नही; एकनाथ खडसेंच्या महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलाच आरोप-प्रत्यारोप केले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात अनेकवेळा टीका टिप्पणी झाली. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी महाजनांना शेरो शायरीतून टोला लगावला आहे. “हम तो शेर पर एहसान किया करते है, … Read more

महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. दरम्यान आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी. सरकारमधील मंत्र्यांच्या एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेले नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही … Read more

मलिकांचे फडणवीसांवरील आरोप म्हणजे नुसता हवेत गोळीबार; गिरीश महाजनांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक व भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर आरोप केले जात आहेत. फडणवीसांवर केल्या जात असलेल्या आरोपावरून नवाब मलिक व शिवसेनेवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचे फडणवीसांवर आरोप म्हणजे नुसता हवेत गोळीबार आहे, अशी टीका महाजन यांनी केली … Read more

आमची ईडी लागली, आता सीडी दाखवा; महाजनांचे एकनाथ खडसेंना आव्हान

Khadase mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या मागे ईडी लावाल तर मी देखील सीडी लावेन अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करताना म्हंटल होत. पण सध्या एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारावर असून आता आमची इडी मागे लागली आहे आता खडसेंनी सीडी लावावी अस जाहीर आव्हान भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहे. गिरीश … Read more

तेव्हाच आमच्याशी “लव्ह मॅरेज” केलं असतं तर आज युतीची सत्ता राहिली असती ; गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहो राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी लगेच ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं तर आज राज्यात सरकार राहिलं असतं, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजने अंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाउसच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार … Read more