यु-टर्न! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील … Read more

राज्य सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारे विधयेक आणण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज मुस्लिमांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के कोटा उपलब्ध करुन देण्याचे विधेयक सादर केले जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. “सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांन ५ … Read more

शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील केवळ ५९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या … Read more

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच पिता-पुत्र एकत्र; आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई : युवा शिवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता पुत्र मंत्रिमंडळात असणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पिता पुत्र एकाच मंत्रिमंडळात असण्याची ही पहिलीच वेळ आहे. शपथ घेताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला. … Read more

शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more

२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय आता समोर आला असून या कर्जमाफीचा फायदा २ लाख किंवा २ लाखाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या … Read more

सावधान ! फेक वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगारांची फसवणूक

 हॅलो महाराष्ट्र टीम, मयूर डुमणे, मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग नावाची फेक वेबसाईट तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईटवरून अनेक तरुण ऑनलाईन अर्ज दाखल करत आहेत. या अर्जाची फी ९५ रुपये इतकी आहे. उमेदवारांची मूलभूत माहिती या अर्जाद्वारे भरून घेऊन ९५ रुपये अर्ज दारांकडून ऑनलाईन घेतले जात आहेत. या वेबसाईटला महाराष्ट्र … Read more

राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या मागितलेल्या पाठिंब्याची माहिती दिली. यावेळी पाठिंबा द्यायचा तर सांगोपांग चर्चा गरजेचं असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज चर्चा केल्याचं पटेल पुढं म्हणाले. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल यांनी राष्ट्रपती राजवटीचा … Read more