मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला … Read more

मजुरांच्या रेल्वे तिकीट खर्चाविषयी निर्णय घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई । लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयी निर्णय घेण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. ‘सर्व हारा जन आंदोलन’ या स्वयंसेवी संस्थेसह अन्य काहींनी केलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयीच्या जनहित याचिकांवर न्या. गुप्ते यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाच्या खर्चाविषयी लवकर … Read more

प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई … Read more

कोरोनाच्या लढाईत योगदान द्या, अन्यथा..; राज्य सरकारची खासगी डॉक्टरांना नोटीस

मुंबई । राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावमुळे सरकारी आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांना एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु व्हावं असं … Read more

केजरीवाल सरकारप्रमाणे ठाकरे सरकार राज्यात दारूवर कोरोना कर आकारणार?

मुंबई । कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील राज्यांच्या तिजोरीत महसूल जमा होणं थांबला आहे. अशा वेळी कोरोनाच्या संकटात राज्य चालवायचं कसं हा प्रश्न प्रत्येक राज्यांना भेडसावत असताना अनेक राज्यांनी महसुलासाठी दारुची दुकानं पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली.मात्र, असं करताना दिल्लीतील केजरीवाल सरकारने दारुवर अतिरिक्त ७० टक्के कर लावला. महाराष्ट्राच्या तिजोरीत सुद्धा महसुलाचा ओघ हा थांबला … Read more

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य … Read more

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा फैसला आता मुंबई हायकोर्टात; याचिका दाखल

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असतानाच याप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत आहेत. भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक मागील २० दिवसांपासून हा विलंब केला जात … Read more

राज्यातील ‘या’ ३ महापालिकांवर प्रशासक नियुक्त करा! राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. त्यामुळं या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठीच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा … Read more

बांधकाम मजुरांना राज्य सरकारचा दिलासा; २ हजार रुपयांची मदत जाहीर

मुंबई । कोरोनाच्या उद्रेकामुळं ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके मजूर वर्गाला बसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं असून त्यांना आर्थिक अडचण … Read more

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत वाढ करण्याचे राज्य सरकारचे संकेत

मुंबई । दिवसागणिक देश आणि राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळं नियोजित एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळं या परीक्षा कधी होणार यावर कोणीही काही सांगू शकत नाही आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून उच्च व शिक्षण मंत्री … Read more