दाखवून देऊ! भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला राष्ट्रवादीचे ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत चॅलेंज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरु करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत … Read more

‘मेगा भरतीत’ भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची घरवापसी होणार! राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले संकेत

मुंबई । मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडलं असून या बातमीचं खंडण केलं आहे. उलट भाजपात गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते … Read more

उर्जामंत्री नितीन राऊतांना बसला शॉक; वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द

मुंबई । राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नितीन राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नितीन राऊत यांनी परस्पर या बदल्या केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही नाराज होते. या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर काही वेळातच … Read more

भाजपच्या ‘जय श्रीराम’ला राष्ट्रवादीचे ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणतं उत्तर..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या प्राधान्य क्रमावर टिप्पणी केली होती. शरद पवारांच्या या टिप्पणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या … Read more

महाराष्ट्राचे पर्मनंट उपमुख्यमंत्री झाले ६१ वर्षांचे; अजित पवार (दादा) यांचा आज वाढदिवस

अजित पवार यांचा आज ६१ वा वाढदिवस असून कोरोना संकटाच्या काळात लोकांनी अतिउत्साह न दाखवता आहे तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, त्या स्वीकारल्या जातील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदाराला कोरोनाची लागण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना आज कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे समजत आहे. खान यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आला असून त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज … Read more

राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे विधान परिषदेचे चे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांचा रॅपिड  अॅन्टीजन्ट कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली   असल्याची  माहिती मिळत आहे. या वृत्ताला परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ,आ.धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोना संसर्गाची लागण झाली असून … Read more

.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

पुणे ।  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द शरद पवारांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. धनंजय मुंडे … Read more

पवारांची मुलाखत उद्धव ठाकरेंवर खुली टीका करण्यासाठीच होती- नारायण राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत चर्चेत आहे. शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील व राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे … Read more

महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो … Read more