राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे विधान परिषदेचे चे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांचा रॅपिड  अॅन्टीजन्ट कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली   असल्याची  माहिती मिळत आहे. या वृत्ताला परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ,आ.धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोना संसर्गाची लागण झाली असून … Read more

.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

पुणे ।  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द शरद पवारांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. धनंजय मुंडे … Read more

पवारांची मुलाखत उद्धव ठाकरेंवर खुली टीका करण्यासाठीच होती- नारायण राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत चर्चेत आहे. शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील व राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे … Read more

महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो … Read more

महाविकास आघाडीत पुन्हा वाद? यंदा काँग्रेस ‘या’ कारणावरुन नाराज

मुंबई । महाजॉब्स हि योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे कि फक्त राष्ट्रवादी , शिवसेनेची ? हा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे युवा नेते आणि प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट केले आहे. महाआघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून आहे. परंतु त्यावर वर्चस्व हे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे आहे.त्यामुळे काँग्रेस नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली … Read more

शरद पवारांनी उलगडला ‘ऑपरेशन कमळ’चा अर्थ

मुंबई | ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमळ हा शब्द आपण अनेकदा भाजपा नेत्यांच्या तोंडून ऐकला आहे. हे ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन लोटस म्हणजे काय? हे आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच सांगितलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत संजय राऊत … Read more

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. … Read more

कुपवाड मध्ये राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षाची निर्घृण हत्या; हल्लेखोरांकडून थरारक पाठलाग करत खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली शुक्रवारी दुपारी खुनाच्या घटनेनं हादरून गेलं. सांगलीतील कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका कोल्ड स्टोरेज मध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षाचा तिघा हल्लेखोरांनी थरारक पाठलाग करून धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केला. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. दत्तात्रय महादेव पाटोळे (वय ४१ रा. वाघमोडेनगर कुपवाड) असे खून झालेल्या … Read more

शिवसेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल अजित पवारांचा खुलासा, म्हणाले..

मुंबई । पारनेर नगर पंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पाचही नगरसेवकांनी घरवापसी केली. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी प्रथमच खुलासा केला आहे. ‘निलेश लंके यांनी काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं असं … Read more

एक शरद… सगळे गारद… शरद पवारांच्या मुलाखतीचा टिझर चर्चेत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली होती. या मुलाखतीचा टिझर त्यांनी आज आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केला आहे. एक शरद… सगळे गारद अशा शीर्षकाखालील हा टिझर चांगलाच आला आहे. शरद पवार यांची … Read more