सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टे़बरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ आँक्टोबरला मतदान व २४ आँक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला … Read more

साहित्य पेटी मिळावी म्हणून हाइटेंशन टॉवरवर चढून कामगाराचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बुलढाणा प्रतिनिधी। बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कामगार अधिकारी कार्यलयामार्फत विविध कामगारांना मोफत साहित्य पेटी दिल्या जात आहेत. मात्र काही कामगारांना साहित्य पेटी मिळवण्याकरीता कार्यालयात चकरा माराव्या लागता आहेत. त्यामुळं वैतागलेल्या कामगाराने अखेर हाइटेंशन टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गजानन ढगे असे कामगाराचे नाव असून चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील तो रहिवाशुई आहे. गेले काही … Read more

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more

हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाइकाने आत्मदहनाचा केला प्रयत्न

बीड प्रतिनिधी। बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद सज्जाद यांची गुरुवारी हत्या करण्यात आली. त्यानंतर सज्जाद यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोमिन कौसर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर राँकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि इतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वेळीच त्यांना पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. लब्बैक युवा मंचच्या माध्यमातून … Read more

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मनसेला महाआघाडीत थारा दिला जाणार नाही असे म्हणले आहे. त्यामुळे मनसे नेमके काय पाऊल उचलणार हे बघण्यासारखेच राहणार आहे. राज … Read more

राज्यातील किल्ले भाड्याने देणार नाही : पर्यटन विभाग

मुंबई प्रतिनिधी | पर्यटनासाठी गडकिल्ले  भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरून अनेक स्तरांवरून झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत   नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. “राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग-१ आणि दुसरे वर्ग-२. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य … Read more

सांगलीत अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश; ३ पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे जप्त

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करून टोळीच्या म्होरक्यास ३ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला नवीन गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर … Read more

कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा

खाऊ गल्ली | श्रावण मास संपला की खवय्यांच्या चिभेला मटणाची ओढ लागते. म्हणूनच आम्ही ही आमच्या वाचकांसाठी कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहे. साहित्य : बारीक चिरलेला कांदा , तेल, चक्री फुल, मसाला पूड, आले लसूण पेस्ट, पांढरी मिरीपूड, पाव किलो मटण,१ वाटी काजू, खसखस, सुके खोबरे, ओल्या खोबऱ्याचे घट्ट दूध … Read more

या कारणामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला लागू शकतो ब्रेक

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले सध्या भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपमध्ये देखील जोरदार तयारी सुरु असल्याचे बोलले जाते आहे. येत्या १ ते ५ सप्टेंबर च्या दरम्यान उदयनराजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होतील असे बोलले जाते आहे. उदयनराजे … Read more

छगन भुजबळ यांना शिवसेनेत नो एन्ट्री ; उद्धव ठाकरेंनी कार्यकत्यांना दिले आश्वासन

मुंबई प्रतिनिधी| छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याच्या चर्चा मागील काही दिवसापासून सतत होत आहेत. अशातच भुजबळ यांना शिवसेनेत घेऊ नये म्हणून नाशिकचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विषयावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण त्यांना शिवसेनेत घेणार नाही असे आश्वासन दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बबनराव घोलप यांच्या … Read more