गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांना भाजप प्रवेशाची ‘या’ नेत्यानं दिली ऑफर

नवी दिल्ली । काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका झाल्याचं समोर आलं होतं. काँग्रेसमधील 5 माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल … Read more

मंदिरं खुली करण्यासाठी आंबेडकरांनंतर आता आठवले करणार आंदोलन

 मुंबई । रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा जाहीर केलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती झालेली असल्यानेच मंदिरं सुरू करावी, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता रामदास आठवले यांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक … Read more

राज्यातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा; रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली. दरम्यान, राज्यात ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत अनेक गोष्टी, ठिकाण हळू-हळू खुली केली जात आहेत. मात्र राज्यात अद्याप धार्मिक स्थळं खुली करण्यात आली नाहीत. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर अशी सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय … Read more

गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद … Read more

अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more

मुख्यमंत्र्यांकडे फक्त स्टेअरिंगच आहे; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई । राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही … Read more

उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान होण्याची ‘ती’ ताकदचं नाही!- रामदास आठवले

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण … Read more

शरद पवार हे आदरणीय असून त्यांच्याबद्दलचं वक्तव्य पडळकरांनी मागे घ्यावं- रामदास आठवले

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह्य विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या पडळकरांच्या या विधानवरून राष्ट्रवादीने आंदोलन केलं, तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजपनेही पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, पडळकर यांच्या या विधानावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही … Read more

राहुल गांधींच्या मोदींवरच्या टीकेला रामदास आठवलेंनी दिलं सॉल्लीड उत्तर, म्हणाले..

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यावर भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून … Read more

चीनला अद्दल घडवण्यासाठी एकदा आरपारची लढाई होऊन जाऊ द्या!- रामदास आठवले

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाल्यांनतर देशात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. चीनची आर्थिक कोंडी … Read more