तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more

सेवानिवृत्त पोलिसाची पत्नी, मुलासह आत्महत्या प्रकरण : तपासात धक्कादायक माहिती उघड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील बेळंकी येथील सेवानिवृत्त पोलिस हवालदार अण्णासाहेब गुरूसिध्द गवाणे, मुलगा महेश अण्णासाहेब गव्हाणे व सौ. मालन अण्णासो गवाणे यांनी राहत्या घरी तिघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकारी अधिनियमानुसार चौदाजणाविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील बेळंकी येथे पोलिस … Read more

विहीरीत ट्रॅक्टर कोसळून बालक ठार; क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर कोसळला थेट विहिरीत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ बनेवाडी येथे विहीरीजवळ उतारावर उभा केलेला बागेतील लहान ट्रॅक्टरवर दोन लहान मुले खेळत असता अचानकपणे तो ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन वर्षांचा बालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने एका सहा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. तेजस श्रीरंग माळी असे … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे आज सकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. रुपाली खोत असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे … Read more

सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा … Read more