उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांच्यावर शिवसेनेनं डागली तोफ

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? अशी विचारणा पाटलांनी केली होती. तर शरद पवार यांना लक्ष करत पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. विशेष म्हणजे पाटील आणि मुनगंवार या दोघां भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखात घेण्यात आला आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? – संजय राऊत

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद उफाळून आला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आज के शिवाजी – नरेंन्द्र मोदी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरांतून सदर पुस्तकाचा निषेध नोंदवला जात आहे. शिवसेना … Read more

ते पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते- खासदार संजय राऊत

काल मुंबईत जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून गेट वे ऑफ इंडियावरील निदर्शनात ‘फ्री काश्मीर’ असा फलक घेऊन उभ्या असलेल्या एका तरुणीचे छायाचित्र माध्यमात प्रसारित झाले होते. या फलकावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

महाविकासआघाडीत कोणतीही कुरबूर नाही,संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल -संजय राऊत

महाविकासाआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी खातेवाटपाचा मुहूर्त काही निघत नाही आहे. खातेवाटपाबाबत महाविकासाआघाडीतील तिन्ही पक्षात बैठकांचे सत्र पार पडत आहेत. मात्र खातेवाटप कधी होणार यावर अजून सस्पेंस कायम आहे. खातेवाटपासंबंधी नेमकं कोण उशीर करत आहे यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले, “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

हम मांगने वाले नही, हम देने वाले है; पक्षावर नाराज नसल्याचे संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मी आणि माझे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे … Read more

लाली अन पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी; सामनातून भाजपवर बोचरी टीका

शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. तसेच शिवसेनेने भाजपचं स्वतःच्या खांद्यावरीलच नव्हे तर राज्यावर असलेलं ओझं उतरवलं, अशी बोचरी टीका ‘सामना’ने केली आहे.

म्हणून शिवसेनेनं केला सभा त्याग; राऊतांचे स्पष्टीकरण

व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.