कोणीही स्वतःला देव समजू नये – संजय राऊत

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेने आज (सोमवारी) भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला देव समजू लागले असून त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांचं आजही एक हटके ट्विट

दररोज सूचक ट्विट करण्याऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी हे ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आजच ट्विट थेट दिल्लीतून केलं आहे.

सत्तास्थापनेमुळं उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर!

सर्वांचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नियोजित अयोध्या दौरा लांबीवर पडला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याकारणाने त्यांनी आपला दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकालाचं स्वागत केलं होतं.

बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो – अमिताभ बच्चन

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह चित्रपट सृष्टीतले कलाकार त्याच्या बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत . “बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो” असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची … Read more

आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी दिलं शेतकऱ्यांना वचन, ‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार!’

आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. सांगली व सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची पाहणीसाठी ते दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील मायणी कातरखटाव या भागातील दाक्ष,बाजरीच्या पिकांची त्यांनी पाहणी केली.

जितेंद्र आव्हाडांनी संजय राऊत यांना दिल्या वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी । सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे सूर जुळताना दिसत आहेत. या नव्याने जुळणारणाऱ्या सुरांचा प्रत्यय आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी सुरांचा सहारा घेतला. आव्हाड यांनी खास आपल्या शैलीत गाणे म्हणतं राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. याबाबतचा एक विडिओ आव्हाड यांनी तयार … Read more

‘साहेब’ काहीही करा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा!

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाटाघाटी सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या आक्रमक मागणीवरून शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थापन हालचालींना वेग आला. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या सांगली जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याभेटी दरम्यान साहेब काही करा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच मुख्यमंत्री करा अशी भावना एका शेतकऱ्याने उद्धव यांना बोलून दाखवली.

काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्यास कचरत आहे- नवाब मलिक

राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामध्ये एकमत होताना दिसत नाही आहे. आज शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा योग्य दिशेनं चालू आहे असे सांगितलं आहे. मात्र काँग्रेस अजून सत्तेत सहभागी होण्यावरून संभ्रमावस्थेत आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत नवाब मलिक यांनी सूचक विधान केलं आहे.

काँग्रेसचे सर्व आमदार मुबंईत दखल, घोडेबाजाराची अजूनही भीती

राज्यात सत्ताकोंडीत कायम आहे. आपले आमदार विरोधी पक्षाच्या गळाला लागू नये या भीतीने काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूर येथे हलवले होते. आता हे शेर आमदार मुंबईत परतले आहेत. विमानतळावर या आमदारांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे दाखल झाले होते.