निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

“काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

वंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर

राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.

गोपीचंद पडळकरांचा येत्या दोन दिवसात भाजप प्रवेश

सांगली प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित … Read more

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर ; यादीत २२ जागांचा समावेश तर जातीचाही उल्लेख

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देखील लोकसभा उमेदवारांच्या यादी प्रमाणे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एमआयएम सोबत पुन्हा संधान नबंधता विधानसभेच्या सर्व जागा वंचित लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. एमआयएमने वंचित सोबत काडीमोड घेतल्यानंतर आपने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित … Read more

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार?

कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे. त्या … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

सांगली प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे . पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे . युती … Read more