दिवाळी गोड : अजिंक्यतारा कारखान्याच्या कामागारांना 18 टक्के बोनस जाहीर

सातारा | ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. होवू घातलेल्या गळीत हंगामातही गाळपास येणार्‍या ऊसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवू, असे आश्‍वासक प्रतिपादन … Read more

300 फूट टॉवरवर तीनजणांचे “शोले स्टाईल” आंदोलन; केल्या या मागण्या

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या 300 फूट टॉवरवर आज तीन आंदोलनकर्त्यांनी चढत वीरूगिरी करुन शोले स्टाईल आंदोलन केलेले आहे. मिल कामगारांच्या मागण्या पूर्ण करा, त्यांचे पगार काढा यासाठी तीन जण सकाळीच फिनले मिलच्या टॉवरवर चढल्याने पोलिसांचे व प्रशासनामधे मोठी धांदल उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात असणारे एनटीसी भारत सरकारमार्फत चालवण्यात येणारी फिनले … Read more

240 कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ; आयटकचे घाटी महाविद्यालयासमोर निदर्शने

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) मधील तसेच कोविड रुग्णालयातील काही कथित कंत्राटी डॉक्टर, सिस्टर, तंत्रज्ञ, कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यामुळे आयटक संघटनेच्यावतीने आज घाटी येथे आंदोलन करण्यात आले. कोरोना सारख्या कठीण काळात घाटीतील कर्मचाऱ्यांनी धोक्यात घालून काम केले असतानाही त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशाजक वातावरण आहे. कोरोनामुळे सर्वांच्या … Read more

कराडातील युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक; पाच तासात पुण्यातून ताब्यात घेतले

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचुुन खुन केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी दोघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने पाच तासात पुणे येथून अटक केली आहे. युवकाच्या … Read more

कामगार दिन आर्थिक शोषण दिन म्हणून करू साजरा. कामगार शक्ती संघटनेकडून इशारा.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगर पालिकेचे ‘ फ्रंट लाईन वर्कर ‘ हे औरंगाबाद शहरासाठी महत्वाची कामगीरी बजावत आहे तरीही त्यांना त्याचे वेतन वेळेवर मिळत नाही या विरोधात कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी औरंगाबाद मनपा विरोधात येत्या १ मे रोजी म्हणजेच कामगार दिनाच्या दिवशी कामगार आर्थिक शोंशन दिन म्हणून मनपा विरोधात आंदोलन करू … Read more

कोविड -१९ मुळे आशिया-पॅसिफिक प्रदेशात गेल्या सर्वाधिक नोकऱ्या, 81 मिलियन लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था स्तब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनच्या (ILO) नुकत्याच केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, आशिया-पॅसिफिक प्रदेशात कोरोना साथीच्या आजारामुळे 81 मिलियन लोकांना रोजगार गमवावे लागले. आयएलओच्या आशिया-पॅसिफिक प्रदेशाचे संचालक चिहको असदा म्हणाले की, कोविड -१९ चा संपूर्ण जगापेक्षा या भागावर अधिक परिणाम झाला आहे. त्यांच्या मते, … Read more

स्टेजवर लॅपटॉपवर ऑफिसची कामे करताना दिसली वधू, लोक म्हणाले मंथली टार्गेट पूर्ण झाले नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आपल्यातील बहुतेकजण घरूनच काम करत आहेत. या अगोदरही आम्ही बर्‍याच वेळा वर्क फ्रॉम होम चे नाव ऐकले आहे, कदाचित ते केले सुद्धा असेल, पण तुम्ही कधी स्टेजवरून वर्क फ्रॉम होम केल्याचे ऐकले आहे का ? नसेल,ऐकले तर, काही हरकत नाही. मात्र एका लग्नात एका वधूने चक्क तसे केले आहे. सोशल … Read more

वर्क फ्रॉम होम करत असाल तर ही ट्रिक वापरून पहा; सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या तीव्र संपर्कात येतो तेव्हा आपले डोळे बऱ्याचदा बंद होतात. तसेच जेव्हा आपण त्याच सूर्यप्रकाशामध्ये मोबाइल फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतो, तेव्हा त्यांची स्क्रीन देखील काहीशी काळी दिसते आणि त्यांचा वापर करण्यास आपल्याला खूपच अडचण येते. आपण काय टाइप करत आहोत हे देखील कळत नाही. पण असे म्हणतात … Read more

‘या’ सरकारी योजनेअंतर्गत श्रमिकांना मिळणार वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारकडून सध्या दोन प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) आर्थिक पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना. या दोन्ही योजनांमुळे सर्वसामान्य, गरीब आणि शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, असं या योजनेचं नाव … Read more

फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम, परंतु…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान, फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम देण्याची ऑफर दिली आहे. कंपनी ही ऑफर बर्‍याच काळासाठी सुरू ठेवू शकते. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की,’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचेच वर्क फ्रॉम होम करण्याची ऑफर देऊ शकते. झुकेरबर्ग म्हणाले की,’ फेसबुकला ‘वर्क फ्रॉम होम’ या … Read more