Thursday, March 30, 2023

आपल्या देशात माघारी जायची इच्छा नाही; अमेरिकन नागरिकाचा हायकोर्टात अर्ज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहरामुळे आजकाल संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. कोरोना विषाणूच्या संसगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बहुतेक कोरोनाची प्रकरणे ही अमेरिकेतून समोर येत आहेत. दरम्यान, एका अमेरिकन नागरिकाने भारतातील उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. जॉनी पॉल पियर्स असे या व्यक्तीचे नाव आहे. जॉनी पियर्स गेल्या हे 5 महिन्यांपासून केरळमधील कोची येथे राहत आहे.

पियर्स सांगतात की कोविड -१९ च्या या आजारामुळे अमेरिकेत अराजकता माजली आहे, ज्यामुळे त्याला परत तिथे जायचे नाही आहे. ते म्हणाले की, अमेरिकन सरकार भारतीय लोकांप्रमाणे आपल्या लोकांची काळजी नीट घेत नाही. मला इथेच राहायचे आहे. पियर्स पुढे म्हणाले की, माझे कुटुंबीयांनी सुद्धा येथेच यावे अशी माझी इच्छा आहे. इथं घडत असलेल्या गोष्टींमुळे मी खूपच प्रभावित झालो आहे. अमेरिकेतील लोकांना कोविड -१९ ची अजिबात चिंता नाही आहे.

- Advertisement -

 

उच्च न्यायालयात याचिका दाखल
75 वर्षीय पियर्स यांनी आपला व्हिसा बदलण्यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पियर्सला आपला पर्यटक व्हिसा हा व्यायसायिक व्हिसामध्ये रूपांतरित करायचा आहे. ते म्हणाले की, याबाबत मी एक याचिका देत आहे ज्यामध्ये मी आणखी 180 दिवस इथे राहू देण्याची विनंती करेन. मला व्यायसायिक व्हिसा द्यावा जेणेकरुन मी येथे एक ट्रॅव्हल एजन्सी उघडू शकेन. तो म्हणाला की, मी येथे अडकलो नाही पण मला इथेच रहायचे आहे, मला केरळ खूप आवडते.

अमेरिकेत कोरोना महामारी
जगातील कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे ही केवळ अमेरिकेतूनच समोर येत आहेत. शुक्रवारी अमेरिकेत सुमारे 71 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. आतापर्यंत एका दिवसात प्रथमच या देशात 71 हजार रुग्ण समोर आलेले आहेत. अमेरिकेतील कोरोना रूग्णांची संख्या ही गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता दुपटीने वाढत आहे, जरी मृतांचा आकडा हा जवळजवळ अर्धा झाला आहे. आजकाल जगात सर्वाधिक मृत्यू हे ब्राझीलमध्ये होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.