सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला बळी गेला आहे. मिरजेतील या ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या हि १४ वर गेली आहे. सद्यस्थितीत २२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मिरजेतील अमननगर येथे राहणारा ५३ वर्षीय पुरुष कर्नाटक येथील अथणी तालुक्यात एका नातेवाईकांच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी गेला होता. लग्न समारंभ आटोपून तो परत आला. ३ जुलै रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने मिरजेच्या एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल दुपारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच प्रकृती अस्वास्थामुळे त्या रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला. त्या रुग्णाला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सून, मुलगा, आई व पत्नीसह इतर काही जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तो राहत असलेला अमननगर परिसर कंटेनमेंट झोन करून सील करण्यात आला आहे.
मृत झालेला रुग्ण हा किराणा मालाचा व्यावसायिक असल्याने तो कोणाकोणाच्या संपर्कात आला होता याचा शोध आता आरोग्य यंत्रणा घेत आहे. मिरजेत कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली होती. मिरजेतील ५४ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूने जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या हि १४ वर गेली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील २२९ बाधित रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.