चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या शक्तिनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या एक अस्वल धुमाकूळ घालत आहे.

परभणीत जिल्हात आजपासून शासकिय कापुस खरेदीचा शुभारंभ

यंदाच्या हंगाममध्ये परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदीचा खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कापूस खरेदी प्रक्रियेत सीसीआयचे सब एजंट म्हणून कापुस पणन महासंघातर्फे पाथरी व गंगाखेड येथे सोमवार दि.२ डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कास्तकारांना मोबदला मिळणार आहे.

म्हणुन शेतकर्‍याने चक्क कुत्र्याला रंग लाऊन बनवलं वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more

परभणी जिल्ह्यात गामपंचायती जोडल्या जाणार वेगवान इंटरनेटने

संपूर्ण राज्यात भारतनेट-महानेट प्रकल्प् महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यांत येत असून या प्रकल्पा्द्वारे परभणी जिल्हाातील ४ तहसिल कार्यालये व त्यांअंतर्गत येणारे ४२८ ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तवरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दारे हा उपक्रम सुरु केला आहे.

साखर आयुक्तांचा ७ साखर कारखान्यांना दणका ! ‘एफआरपी’ची रक्कम न भरल्याने परवाने रोखले

शासकीय भागभांडवला सह शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे. यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.

बेदाणा सौद्यास २१५ रुपयांचा भाव

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे दिवाळीनंतर एक महिन्याच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डामध्ये पहिल्या बेदाणा सौद्यात किलोला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सौदयासाठी ५० गाड्यांची आवक झाली. सौद्यामध्य सरासरी दर १६० ते २१० रुपये राहिला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यापुढील कालावधीत बेदाण्याची आवक घटणार असून चांगला दर मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या – विलासराव जगताप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रब्बी हंगामातील पिक विमा, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, यांसह नगरपालिका, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क अधिक्षक आदी ठिकाणी सुरु असणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी जतचे माजी आमदार विलास राव जगताप यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले . मागील वर्षभरामध्ये अवर्षणामुळे रब्बी पीक … Read more

शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more

कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला, उभ्या सोयाबीन पिकावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.