माणची जागा आमची शान, फलटणची जागा आमची जान आहे – महादेव जानकर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रासप विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर राहणार असून फलटण उत्तर कोरेगाव मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही माणची जागा आमची शान आहे. फलटणची जागा आमची जान आहे ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची आहे असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले येथील महाराजा मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे … Read more

पुलवामा हल्ल्याच्या विधानावरून आशिष शेलारांची पवारांवर टीका

मुंबई प्रतिनिधी |  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईमधील सभेत कलम 370 च्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा … Read more

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची त्यांच्या पक्षांतरावर सूडकून टीका

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही. शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यातील आठ जागांची काँग्रेस राष्ट्रवादीत अशी झाली वाटणी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुण्याचे जागांचे वाटप जाहीर केले आहे. पुण्यात कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कोणत्या मतदारसंघात काँग्रेस लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसमोर निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असून गतवेळी पुण्याच्या आठी जागी जिंकलेल्या भाजपला पराभूत करणे राष्ट्रवादी … Read more

युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडून २४ ऑक्टोंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच एका मराठी वृत्तवाहिनीने निवडणुकीचा निकाल कसा असेल याचा सर्व्हे प्रदर्शित केला आहे. गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान … Read more

युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार … Read more

निवडणुकीचे बिगुल वाचाताच पवारांचे भावनिक ट्विट ; म्हणाले मला काहीच नको

पुणे प्रतिनिधी |  निवडणुकी आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच शरद पवार यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट केले आहे. या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता काहीच नको आहे असे त्या ट्विटमध्ये पवार म्हणाले आहेत. “या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले … Read more

ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?

विशेष प्रतिनिधी |  सुरज शेंडगे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आज पासूनच आचार संहिता लागू केली आहे. हि आचार संहिता म्हणजे नेमकी काय … Read more

उदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत नाहीच

नवी दिल्ली | आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकी सोबत लागावी असे त्यांना वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मात्र लागली नाही. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. … Read more

युती बाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

मुंबई प्रतिनिधी | युती बाबत अंतिम बोलणी झाली आहेत अशा बातम्या येऊ लागल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेत उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणी लोकसभा निवडणुकीसाठीच झाली आहेत. ५०-५० टक्के जाग्यांवर आम्ही लढणार आहे हि माध्यमांनी उठवलेली बातमी आहे. वास्तवात आमच्यात जे जागा वाटप झाले आहे. त्यासंदर्भात लवकरच … Read more