महिला आमदाराने भरसभेत युवकाच्या लावली कानशिलात; करत होता अश्लिल खुना

पटना, बिहार | महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिला संघर्ष करावाच लागतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना बिहार मधील पटना शहरात घडली आहे. 30 जानेवारीला विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या महिला आमदाराला अशा वागणुकीचा सामना करावा लागला आहे. अश्लील खुणा करत असलेल्या युवकाला महिला आमदाराने स्टेज खाली उतरून … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

‘त्या’ महिलेच्या खुनातील आरोपी मोदींच्या मंचावर, भाजपाकडून विधानसभेचं तिकीट

झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भाजपावासी असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाले. शशिभूषण मेहता यांच्यावर खूनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. मात्र, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भाजपाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.

अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता

राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअर्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहे

सांगली जिल्ह्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळली आहे,यामुळे या ‘नेत्यांनी’ संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहेत असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.