राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह कुटुंबियांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ जाहीर

पुणे | गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे, दि.१५ |  खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

चिंता वाढली! पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार पार

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला … Read more