लक्ष्मी रोडवर वर्दळ सुरु झाली आता तुळशीबाग केव्हा उघडणार ? 

पुणे । पुणे शहर म्हंटल्यावर डोळ्यासमोर काही ठिकाणे येतात. सारसबाग, लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही सर्वप्रथम नजरेसमोर येणारी ठिकाणे आहेत. कुठूनही आलेला मनुष्य एकदातरी या ठिकाणांना भेट देतोच. ही ठिकाणे प्रसिद्ध आहेतच पण नेहमीच वर्दळीखाली असणारी आहेत. मात्र संचारबंदीमुळे ही गर्दीची ठिकाणे शांत झाली होती. नेहमी लोकांनी गजबजलेले हे रस्ते सुमसान भासत होते. मात्र दोन … Read more

चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी … Read more

चिंताजनक ! परभणीची रेड झोनकडे वाटचाल ; एकाच दिवसात सापडले नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील चार दिवसांमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमूळे परभणी जिल्ह्याची वाटचाल वेगाने रेड झोनकडे होत आहे .आज आलेल्या स्वॅब अहवालातून नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचा कोरणा बाधित रुग्ण संख्येचा आकडा दोन अंकी संख्येवर गेलाय . त्यामुळे जिल्हा वासियांची धडधड वाढलीय .जिंतूर तालुक्यातील शेवडी गावांमध्ये एकाच दिवशी तीन जणांना … Read more

वुहानच्या ‘त्या’ लॅबमध्येच कोरोनाचा जन्म झाला? WHO करणार निष्पक्ष तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी कोरोना विषाणूसंदर्भात स्वतंत्र मूल्यमापन करण्यासंदर्भात बहुतेक सदस्य देशांनी केलेल्या आवाहनापुढे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) झुकली आहे. या साथीच्या प्रसारावरुन अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तसेच जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आफ्रिकन ,युरोपियन देश आणि इतर देशांच्या संघटनेने कोविड -१९च्या जागतिक … Read more

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येनं गाठला १ लाखांचा टप्पा; पटकावलं ११ स्थान

नवी दिल्ली । कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना संकटादरम्यान ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही संक्रमितांच्या आकड्यात सतत लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. देशात आता कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एक लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातील ११ वा देश बनला आहे. … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार पार; तर आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला तरीही कोरोना बाधितांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशव्यापी ५५ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत मात्र कोरोना संक्रमणाचा वेग वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५,२४२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १५७ मृत्यू झालेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे … Read more

मागील २४ तासांत देशभरात ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारांच्या पुढे पोहचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 … Read more

दिलासादायक! देशात २०,९१७ रुग्ण करोनामधून बरे

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताच आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येनं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. मात्र, देशभरातील आरोग्य यंत्रणांच्याच प्रयत्नानं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २० हजार ९१७ रुग्ण … Read more