राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ८१७ वर

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसून राज्यातील को रोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले असून १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३१० झाली असून ९५७ जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू … Read more

स्वाब चे नमुने घेण्यासाठी औरंगाबाद मनपाकडे टेस्ट किट नाहीत; नगरसेवकाचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | समतानगर येथे कोरोणाचे रुग्ण सापडल्यानंतर तेथील ८० पेक्षा अधिक नागरिकांना समाज कल्याणच्या वसतिगृहातिल अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे. परंतु प्रशासनातर्फे त्यांची कोणतीच सोय करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून त्यांना जेवन नसून पिण्याचे पाण्याची सोय सुद्धा नाही. ते होस्टेल प्रांगणातच बसलेले असल्याचे दिसून आले आहे. यावर स्थानिक नगरसेवक अशफाक कुरेशी … Read more

चीनने पाठवलेल्या ‘बोगस’ रॅपिड टेस्ट किट भारत परत करणार- केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली । चीनकडून आयात करण्यात आलेल्या ‘रॅपिड टेस्टिंग किट’ चुकीचा निकाल देत असल्यानं अशा बोगस किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्यानं सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी राज्यांच्या संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन … Read more

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारा पार; गेल्या २४ तासात १६८४ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात गेल्या २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे … Read more

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

वुहान येथून बेपत्ता झालेला पत्रकार २ महिन्यांनंतर सापडला,गायब होण्यामागचे कारण सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील कोरोनाव्हायरस या साथीच्या सुरुवातीच्या काळात वुहानमधून गायब झालेला एक नागरिक पत्रकार सुमारे २ महिन्यांनंतर परत आला आहे.वुहानच्या या नागरिक पत्रकाराने कोरोना विषाणूशी संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिलेली होती. त्यानंतर तो अचानक गायब झाला.परत आल्यावर पत्रकाराने सांगितले की चीनी पोलिसांनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि क्वारंटाइन केले. … Read more

सिगरेटमुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो? फ्रांसमध्ये संशोधन सुरु

वृत्तसंस्था । कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील संशोधक कसोशीने प्रयन्त करत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून जगाला मुक्त करण्यासाठी लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. यातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अशाच एका प्रयोगानुसार सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता संशोधन सुरु … Read more

सचिनच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पोलिसांनी दिला नागरिकांना ‘स्ट्रेट ड्राईव्ह’चा सल्ला

#HappyBirthdaySachin । आपल्या फलंदाजीतून अनेकांना आनंद देणाऱ्या, क्रिकेटला नवी कलाटणी देणाऱ्या, क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर असणाऱ्या, विश्वात चाहत्यांनी देवाची पदवी बहाल केलेल्या लाडक्या सचिनचा आज वाढदिवस. आज जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलिसांनीदेखील सचिनला आज शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ‘टन’भर शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना राज्यातील … Read more

कोरोनाचा अमेरिकेला आणखी एक जबरदस्त हादरा! गेल्या २४ तासांत ३१७६ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून मृतांची संख्या ५० हजाराजवळ पोहचली आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक करोनाबाधित असून २० हजार जणांचा मृत्यू झाल आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे ३ हजार १७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण ८ लाख ६७ हजार ४५९ जणांना कोरोनाची लागण … Read more

कोरोनाच्या लढ्यात गाव-खेडयांच्या सहभागाला मोदींनी केला सलाम, म्हणाले..

नवी दिल्ली। ”देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो गज दूरी’ असा शब्द वापरून गावातील जनतेनं कोरोनाचा सामना केला. अशा प्रकारांवरूनच इतरत्र कोरोनाचा भारतानं कसा सामना केला याची चर्चा होत आहे. भारताचा नागरिक कठीण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे,” असं मत पंतप्रधान … Read more