तुम्हाला हे माहित आहे काय? भारत सर्वाधिक पीपीई कीट तयार करणारा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश

नवी दिल्ली । कोरोनाच्या लढ्यात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोनाच्या लढाईत महत्वाचे साधन असणारे पीपीई कीट उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास पीपीई कीट चिलखताची भूमिका बजावत आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत भारत सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या … Read more

भारतात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील २४ तासात १४८ मृत्यूंची नोंद झाली असून देशातील मृतांची एकूण … Read more

पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही … Read more

भारतीय लष्करही म्हणतंय संपूर्ण जगाला पोलिसांचा अभिमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य  पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश … Read more

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटलांनी हाणला चंद्रकांतदादांना आंदोलनांवरून टोला

मुंबई । राज्यात कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली असून त्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापू लागलं आहे. या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं असून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांनी भाजपला … Read more

चिंताजनक! भारत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये इटलीच्याही पुढे

नवी दिल्ली । जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या विषाणूने आपले हातपाय संपूर्ण जगात परसरवले आहेत. अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयन्त करत आहेत. पण कोरोनाचा वाढता संसर्ग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी ही संख्या आता कोरोना … Read more

भारतात २४ तासांत 5 हजार 609 नवे कोरोनाचे रुग्ण, 132 मृत्यू

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील २४ तासांचा कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास कोरोनाबाधितांची संख्येत पाहिजे तशी घाट अजूनही होताना दिसत नाही आहे. मागील २४ तासात देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी आधीच १ लाखांचा … Read more

नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता.

सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला, आघाडीतून बाहेर पडण्याची ‘हीच ती वेळ’ अन्यथा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक आणि विशेषतः निवडणूक निकालानंतरची मुख्यमंत्री पदाची निवड होईपर्यंतचा काळ चांगलाच गाजला आहे. अनेक चढ-उतारांनी या निवडणुकीने देशभरात चर्चेला कारण दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज नव्याने त्यांच्यावरच्या टीका आणि त्यांना दिले जाणारे सल्ले चर्चेत येत असतात. याच चर्चांमध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी एक नवा मुद्दा दिला … Read more

… म्हणून ‘राज’ पुत्र अमित ठाकरेंनी लिहलं काका उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सरकारला सूचना करतच असतात. राजकारणात नुकतेच पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार आक्षेप घेतला आहे. “कोरोनामुळे … Read more