पत्नीला कोरोनाची लागण, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाईन

अहमदनगर । राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याआधी मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात … Read more

सोलापूरात घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या

सोलापूर प्रतिनिधी । देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आयुक्तांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सोलापूरमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवस घरातच होम क्वारंटाइन करण्यात येणार … Read more

खासदार अमोल कोल्हे ‘होम क्वारंटाईन’; कोरोना संक्रमिताच्या आले होते संपर्कात

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेले दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही कोल्हे यांनी सांगितलं आहे. जय शिवराय! नमस्कार, आपल्याला एक महत्वाची … Read more

भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण

अहमदनगर । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परजिल्ह्यातून आपल्या गावात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसारच ही कार्यवाही होत असली तरी ग्रामीण भागात यावरून तंटे सुरू झाले आहेत. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा … Read more

मुंबईतून थेट यूपीतील आपल्या गावात पोहोचला नवाजुद्दीन सिद्दीकी; १४ दिवस होम क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे आपल्या घरी पोहोचताच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तो मुंबईहून नुकताच मुझफ्फरनगरला आला आहे. आता तो आपल्या कुटुंबासमवेत १४ दिवस क्वॉरंटाईन राहील. या अभिनेत्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे. ज्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारचे परवानगीपत्र … Read more

होम क्वारंटाईनचे शिक्के मारून वाधवान कुटुंब वाधवान हाऊसला रवाना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीत येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर … Read more

गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी झाले होम क्वारंटाईन; केली कोरोनाची चाचणी

वृत्तसंस्था । गुजरातमधील काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. त्याच कारण म्हणजे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. सध्या विजय रुपाणी यांची तब्येत ठीक आहे. मात्र, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला … Read more

जितेंद्र आव्हाड ‘होम क्वारंटाइन’, कोरोना पोझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने निर्णय

मुंबई । वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. खुद्द आव्हाड यांनीही ‘होम क्वारंटाइन’च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं … Read more

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीहून आसामला परतल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या लोपामुद्रा यांनी सांगितले की, कालांतराने आसामने किती कठोर खबरदारी घेतली आहे. हे नोंद घ्यावे लागेल की ३० जानेवारी रोजी इटलीमध्ये पहिले प्रकरण नोंदविण्यात आले होते. लोपामुद्रा मिलानमधील लाइको येथे होत्या. तिने पॉलिटेक्निको डाय मिलानो येथे आर्किटेक्चरल अभियांत्रिकीचा अभ्यास केला आहे.२२ फेब्रुवारी रोजी लोपामुद्राला समजले की इटलीमध्ये … Read more

लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more