परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

कांदे कमी खायला सांगणारं सरकार गेलेच पाहिजे – पी. चिदंबरम

कांद्याच्या भावाबाबत देशात खळबळ उडाली आहे, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे की मी कांदा खात नाही. म्हणून मला काही फरक पडत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आक्रोश वाढला आहे. त्यामुळे १०६ दिवसांनंतर तुरूंगातून बाहेर आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम म्हणतात की ज्या सरकारने कमी कांदा खाण्यास सांगितले आहे. ते सरकार गेले पाहिजे.

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

लातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष

भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना ‘राफेल’ उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

देशाची अर्थव्यवस्था संकटात; अर्थमंत्र्यांच्या पतींचा घरचा आहेर

‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा नीचांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे ”. असा घरचा आहेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतींनी मोदी सरकारला दिला.

सुजय विखे पाटलांनी शिर्डीचा ‘तो’ रखडलेला प्रश्न लोकसभेत मांडला

नवी दिल्ली |निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ भाषण देण्यासाठी भाषण करत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी शिर्डीचा रखडलेला प्रश्न आज लोकसभेत मांडून त्या प्रश्नाकडे सर्वांचे तसेच दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे देखील लक्ष आकर्षित केले आहे. पुणे शिर्डी आठ पदरी रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी आज … Read more

Budget 2019 | अर्थव्यवस्था या वर्षीच ३ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठेल

नवी दिल्ली | एक ट्रिलयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठण्यासाठी ५५ वर्ष लागली, आम्ही फक्त पाच वर्षात त्यात एक ट्रिलियन डॉलर्सची भर टाकली आणि याच वर्षी आपली अर्थव्यवस्था तीन डॉलर्सचे लक्ष्य गाठेल असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंदाजपत्रक मांडतांना व्यक्त केला. Finance Minister Nirmala Sitharaman: It is also proposed to increase custom duty on gold … Read more