राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना … Read more

सत्तावाटपात मिळालेल्या अधिकारांत शरद पवारांचा मास्टरप्लॅन, कार्यकर्त्यांना दिली चतुसुत्री

सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा ते स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने आता राष्ट्रवादीसमोर घोडा यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार … Read more

राष्ट्रवादी हा मतांची गणितं जुळवून दगाबाजी करणारा पक्ष – सुधीर कोठारी

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुधीर कोठारी यांनी बंडखोरी केली आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणत शरद पवारांनी दिली माढ्यात बबन शिंदेंना उमेदवारी

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्यात फाटल्याची चर्चा माध्यमात होती. गणेश उत्सवात बबन शिंदे हे शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा शरद पवारांनी त्यांना भेट नाकारली. मात्र बबन शिंदे शिवाय माढ्याची जागा कायम ठेवता येणार नाही असा सारासार विचार करून शरद पवारांनी बबन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूर … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.