गोव्यातील गुटखा किंग जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन याला अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीनंतर ईडीने केली कारवाई

नवी दिल्ली । गोवा गुटखा किंग (Goa Guthkha King) ओळखले जाणारे उद्योजक जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन जोशी (Sachin Joshi) याला प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने सचिनची मुंबई शाखेत कित्येक तास चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील रहिवासी असलेल्या सचिन जोशीला ओंकार बिल्डरशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money … Read more

तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार … Read more

बिंग फुटण्याच्या धाकाने प्रियकराने दिले गरोदर प्रेयसीला गर्भपाताचे औषध, पण झालं काही असं..

भंडारा । अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिले. या औषधामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. यानंतर याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अरोली पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम कटरे (वय २४) असं या युवकाचे नाव असून लैगिक अत्याचारासंबंधी विविध कलमांतर्गत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे … Read more

कोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंटेनर मधून वाहतुक केली जात असलेला 1 हजार किलो गांजा आज तेलंगणा पोलिसांनी पकडला. यावेळी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.3 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक कंटेनर … Read more

‘भारतातील अनेक सामन्यांमधील फिक्सिंगचा तपास करत आहोत’ -आयसीसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीयू) वरिष्ठ अधिकाऱ्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की,मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून घोषित करणे हे अशा देशांमध्ये सर्वात प्रभावी पाऊल ठरेल जिथे क्रिकेटमधील भ्रष्टाचारी कारवायांची चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांचे हात हे कायद्याने बांधलेले असतात. कायदेशीर तज्ञ अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग हा गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला तर होऊ शकतो गुन्हा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब … Read more

MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, … Read more

लाॅकडाउन असताना संरपंचाने लाऊडस्पिकरवरुन गावकर्‍यांना मंदिरात बोलावले; यात्रा भरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | गावामध्ये यात्रा भरवून नागरिकांना मंदिरात येण्याचे आवाहन करणार्‍या जावळी तालुक्यातील संरपंचाविरोधात मेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील वालुथ ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वालुथ (ता. जावळी) येथे ग्रामदैवत यात्रा दि. 21 व 22 रोजी होती. जगावर आलेले महामारीचे … Read more

धक्कादायक! कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची तरुणांनी दुचाकी जाळली

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात घडला आहे. एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी काही तरुणांनी जाळण्याचा प्रकार कुंभारी  येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडला आहे. मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल … Read more