तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

आता कसं वाटतंय.. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय.. अशा घोषणा यावेळी नागरिकांनी देत एकप्रकारे निषेध आणि आनंद दोन्ही व्यक्त केला.

हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

टीम हॅलो महाराष्ट्र । दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश … Read more

नाणार रिफायनरी विरोधी ठिणगी, मुख्यमंत्र्यांनं विरोधात निषेध सभा

रत्नागिरी प्रतिनिधी। नाणार रिफायनरी विरोधातली टप्पा दोनची संघर्षाची ठिणगी आज पुन्हा एकदा पडली. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या जोडीनं मैदानात उतरली आहे. नाणार पंचक्रोशीतल्या तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. ‘याद राखा’ रिफानरी प्रकल्पासाठी गावाच … Read more

मी आत्ताच मुख्यमंत्री आहे- इंदोरीकर महाराज

अहमदनगर प्रतिनिधी। भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एका कीर्तनात संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर … Read more

कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. रात्री … Read more

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

मंबई प्रतिनिधी | येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. जागावाटपात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असे ही ते म्हणाले.

उल्हासनगरच्या गोलमैदानात आज आठवले यांनी सभा होती.त्या वेळी सभास्थानी १०नंतर आलेल्या आठवल्यानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उल्लंघन करून १० वाजून २० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर भाषण केले.यावेळी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

तुमच्या नव्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे असणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

भुसावळ प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर असल्याचे आपण पहिले आहे. एकाच पक्षात राहून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष असल्याचे उभा महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा वादांकित पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल विचारण्यात आले असता त्यांनी त्या प्रश्नाला दिल्लीकडे बोट दाखवून पद्धतशीर बगल दिली. मुख्यमंत्री … Read more

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात

भुसावळ प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर माध्यमात सारख्या बातम्या झळकत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये कधी येणार असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रे निमित्त भुसावळ येथे आले असता … Read more