कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

महाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का ? – राजू शेट्टी

स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना काल समोर आली होती. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे.

रविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ सोडून ‘रयत क्रांती संघटने’त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर बिल्ला लावून त्यांना पुन्हा प्रवेश दिला. ‘स्वभिमानी संघटने’त असलेल्या अंतर्गत मतभेदातून संघटना सोडल्या’चं रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राजू शेट्टी यांना मोठा धक्का; स्वाभिमानीचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये

कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

राजू शेट्टी लढवणार विधानसभा ; या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , माजी खासदार राजू शेट्टी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आघाडीच्या घटक पक्षांनी विनंती देखील केली आहे अशी माहिती समोर येत आहे. काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का चंद्रकांत पाटील हे जर … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस … Read more

गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलोय, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Untitled design

पुणे प्रतिनिधी | अजय निमसे  “केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफ.आर.पी. निश्चित केला आहे. परंतु तोही आता भेटत नाही. ट्रेजरी खाली करणारे मुख्यमंत्री कुठे गायब झाले आहेत. गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलो आहोत” असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी … Read more