शेतात ‘याची’ लागवड केली तर शेतकरीही कमवू शकतो लाखो रुपये; खर्च केवळ ५० हजार

Alovera Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील बहुतांश लोकसंख्या ही गावभागात राहते. मात्र येथील बरेच लोक रोजगारासाठी बाहेर जात असतात. गावात रोजगाराचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याची धारणा या लोकांची असते. आज आपण अशा काही व्यवसायांची माहिती घेऊया ज्यातून गावी राहून आपण चांगले पैसे कमवू शकतो. साधारण ४० ते ५० हजार रुपये गुंतवून हे व्यवसाय सुरु करता येतात. … Read more

SBI शेतकऱ्यांना देते विशेष कर्ज, केवळ ४% आहे व्याजदर; जाणून घ्या सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्जाची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही बँका शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असतात. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय … Read more

सौरपंप योजनेतून बसवलेल्या सौरपंप प्लेट चोरट्यांनी केल्या लंपास; गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात महावितरण मार्फत शेतीला विनाव्यत्यय वीज पुरवठ्यासाठी अनुदानित स्वरूपात दिलेल्या सौर पंपाच्या प्लेटच चोरीला जाण्याची घटना घडली असून याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पाथरी पोलीस . ठाण्यात गुन्ह्याची नोंद दाखल झालाय . सौपंपाचा ५ वर्षाचा विमा असला तरी चोरीच्या या  घटनेनंतर शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतीसाठी शाश्‍वत वीज पुरवठा व्हावा … Read more

सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूमुळे चित्रपट व मालिकांचं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा एकदा सुरु होतं आहे. मात्र अजुनही अनेक कलाकार करोनाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी मुंबईत परतलेले नाहीत. भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव याने देखील अद्याप शूटिंगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी तो शेतात काम करुन आपला वेळ घालवत आहे. खेसारी लाल … Read more

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more

कृषिमंत्र्यांचे स्टिंग ऑपेरेशन; शेतकरी बनून दुकानात खत मागतात मात्र…

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले. खतांचा … Read more

गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात दाखल; शेतकरी सुखावला

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाला असून येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २ – ३ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून यामुळे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक कर्ज आता मिळणार ऑनलाईन

सोलापूर प्रतिनिधी । बळीराजाला शेतीतील कामे सोडून वारंवार हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी त्यांना आता पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या नव्या प्रयोगाला कालपासून सोलापूरमधून सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनामुळे सरकारी कार्यालये आणि विकास सोसायट्यांची कार्यालये बंद असल्याने सर्व उतारे संबंधित बँकांनी ऑनलाईन काढुन प्राप्त अर्जावर तीन दिवसात कार्यवाही करायची आहे. आता हा … Read more

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले … Read more