पालघर मधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के; कुठलीही जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून , या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातिल डहाणू, तलासरी तालुख्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more

मावळ विधानसभा : भाजपच्या बाळा भेगडेंच्या उमेदवारीला बंडाळीचे ग्रहण ; भाजपच्या सुनील शेळकेना राष्ट्रवादीची उमेदवारी

पुणे प्रतिनिधी | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ बंडखोरीच्या कृत्याने चर्चेत येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुनील शेळके राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली आहे. भाजपने या आधी मावळ विधानसभा मतदारसंघातून एका … Read more

म्हणून शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्या नंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात … Read more

राजू शेट्टींना दणका : स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करणार भाजपात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा … Read more

लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आघाडीचे उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315] … Read more

राज्य सहकारी बँक घोटाळा : निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने केला गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटपामुळे झालेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांना हा आजपर्यंतच्या राजकीय जीवनात मिळालेला सर्वात मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश … Read more

या १२ जागांवरून शिवसेना भाजपमध्ये आहे तणाव

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला ११५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना १२५ च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे १० ते १२ जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा होण्यासही विलंब लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या … Read more

Breaking| शिवस्मारकाच्या कामात घोटाळा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहार या बाबत कॅगच्या अधिकाऱ्याने तक्रार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. स्मारकाची एक विट देखील नरचता स्मारकासाठी ८० कोटी रुपये खर्च कसे झाले. … Read more

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला … Read more