भय कोरोनाचे! टेस्ट रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाने केली आत्महत्या

पुणे । कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यात आज धक्कादायक घटना घडली. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने एका २४ वर्षीय रुग्णाने आज येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.पुणे शहरातील बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात काल (१४ मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

…म्हणून लॉकडाऊनमध्येही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाने आणि राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. येत्या २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल. दरम्यान, राज्यातील … Read more

कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत; दिले ‘इतके’ कोटी

वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक संघटना आता मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागतिक बँकेने भारताला मोठी आर्थिक मदत केली आहे. जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती. … Read more

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते.

दुर्दैवी! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई । मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यू … Read more

लपूनछपून दिल्लीतून चीनला पाठवले जात होते ५ लाख मास्क अन् ५७ लिटर सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता, देशात मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीईच्या किटची मागणी वाढत आहे. या दरम्यान, सध्या गरज असलेल्या या वस्तू बेकायदेशीरपणे चीन तसेच अन्य देशांत एक्सपोर्ट केल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. गुप्तचरां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील आयजीआय विमानतळावर एयर कार्गो वर कस्टम विभागाकडून छापे टाकण्यात … Read more

मांजरांमुळे पसरु शकतो कोरोना ? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे पाळीव मांजर असल्यास आणि आपल्याला ती खूप आवडत असल्यास, तिचे चुकूनही चुंबन घेण्याचा प्रयत्न करू नका. एका लॅबने केलेल्या प्रयोगामध्ये याची पुष्टी करण्यात आलेली आहे की कोरोना विषाणू असलेली मांजर ही बाकीच्या मांजरांनाही संक्रमित करु शकते तसेच या मांजरांमध्ये कधीही कोविड -१९ची लक्षणेही दिसून येणार नाहीत. या प्रयोगाचे हे निकाल … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

कोरोना HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही, WHOची चेतावनी

वृत्तसंस्था । संपूर्ण जग कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे. जगभरात लॉकडाऊनमुळं लोक घरात कोंडून आहे, उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा बिकट परिस्थितीतून जात असताना जीवघेणा कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. … Read more

कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यू कशा प्रकारे होतो, हे शास्त्रज्ञांना आढळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणा-या रोगाची लक्षणे, त्याचे निदान आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की कोविड -१९ मुळे होणारे मृत्यू मुख्यत: प्रतिकारशक्तीच्या अति-सक्रियतेमुळे होतो. ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी टप्प्याटप्प्याने याबाबतीत वर्णन केले आहे की हा विषाणू श्वसनमार्गास कसा संक्रमित … Read more