पाकिस्तानमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशीच लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने सरकारच्या चिंतेत भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिन्यातील कोरोनाव्हायरसच्या साथीमध्ये लोकांच्या वृत्तीमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कपाळावर चिंता पसरली आहे. इम्रान सरकारने अनेक मार्गांनी लॉकडाऊन शिथिल केले आणि तरीही इतर लोकांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही,याचा परिणाम असा झाला की, देशात रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मशिदी आणि रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला. हे लक्षात … Read more

चीनमधील वुहान शहरातील रुग्णालयातून शेवटच्या कोविड -१९ च्या रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वुहानमधील शेवटच्या कोविड -१९ च्या रूग्णास आता रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना विषाणूचे एक केंद्र असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सुमारे ८० हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) सोमवारी जाहीर केले की कोरोना व्हायरस संसर्गाच्या … Read more

तब्लिगी जमातीतील २०० कोरोनामुक्तांचा प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार

१०८० तब्लिगिंपैकी ८७० पेशंट कोरोनामुक्त झाले आहेत. यातील २०० पेशंटनी बाकी कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज देण्याचा निर्धार केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोनावर मात,पूर्णपणे बरे होऊन केली पुन्हा कामाला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनाव्हायरसवर मात केल्यावर पुन्हा कामावर परतले आहेत. कोविड -१९ ने संसर्ग झालेले जॉन्सन यांनी सोमवारी पुन्हा कार्यालयात येणे सुरू केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ब्रिटिश पंतप्रधान १० डाऊनिंग स्ट्रीटवर परत आले आहेत. वरिष्ठ मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यापूर्वी त्यांनी कोविड -१९ या साथीच्या विषयावर मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची अपेक्षा … Read more

रमजानमध्ये मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मौलवीला झाली कोविड -१९ ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील स्थानिक मशिदीत नमाज पठण करणाऱ्या मौलवीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बीडियूझेन २४ च्या वृत्तानुसार, मौलवी यांनी मगुरा जिल्ह्यातील आडंगा गावात मशिदीत शनिवारी रमजानच्या नमाजचे नेतृत्व केले आणि एका दिवसानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. बातमीनुसार, अधिकारी नमाजमध्ये सामील झालेल्या २०-२५ लोकांची यादी … Read more

महसूली तूट भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर COVID उपकर लावा! कुमारस्वामी यांची मागणी

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कर रुपाने महसूल जमा होत नसल्याने अनेक राज्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या होत चालल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुलाचे सर्व स्रोत बंद आहेत. सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसवर नियंत्रण … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजाराच्या दारात; २४ तासात सापडले १३९६ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे १ हजार ३९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे. ३८१ रुग्णांना एकाच दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचसोबत रुग्णांचा … Read more

आपल्यांनीच दिला सरलारला दगा; २४५ रुपयांना चीन कडून खरेदी केलेले किट सरकारला दिले ६०० ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दिलेल्या खराब रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट किटसाठी दुप्पट पेमेंट घेतल्याचे आता उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड -१९ची चाचणी किट भारतीय डिस्ट्रिब्यूटर्स रिअर मेटॅबोलिक्स आणि आर्क फार्मास्युटिकल्सने सरकारला बर्‍याच जास्त किंमतीला विकल्या आहेत.डिस्ट्रिब्यूटर्स आणि आयात करणार्‍यांमधील कायदेशीर वाद हा दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला नसता तर त्याचा खुलासाही … Read more

बडे दिलवाला ‘खिलाडी’ कुमारकडून मुंबई पोलिसांना ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई । कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. बऱ्याच सिने कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिलेत. अभिनेता अक्षय कुमारनं देखील लोकांच्या जीवासाठी रस्त्यावर दिवस रात्र पहारा देणाऱ्या मुंबई … Read more

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडले ‘हे’ २१ महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी अशा पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही चौथी वेळ होती. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली … Read more