‘ड्रायक्लीनर देवेंद्रजींनी ‘त्या’ सर्वांना क्लीनचीट दिली, पण मला देऊ शकले नाही याच कारण काय?’- एकनाथ खडसे

मुंबई । गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांना ड्रायक्लीनर असं संबोधलं आहे. … Read more

काल जन्माला आलेले नेते, आम्हाला अक्कल शिकवू लागलेत! खडसेंची फडणवीसांचे नाव न घेता टीका

जळगाव । काल जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत अशा शब्दांत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा सुचक इशाराही खडसे यांनी दिला … Read more

एकेकाळी फडणवीसांची शिफारस मीच केली होती, त्याचीच आज शिक्षा भोगतोय- एकनाथ खडसे

जळगाव । भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्यातील पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशा वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती त्याचीच आज शिक्षा मी भोगतोय, अशी खदखद प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भूतकाळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते … Read more

एकनाथ खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत? म्हणाले…

जळगाव  । भाजपचे राज्यातील जेष्ठ आणि दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना भाजपने विधान परिषदसाठीच तिकीट नाकारलं. यामुळं भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे तीव्र नाराज असून त्यांनी भाजप सोडण्याचे आता संकेत दिले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे. “मला संधी … Read more

भाजपची चौथी यादी जाहीर ; तावडे खडसेंचे तिकीट कापले तर रामराजेंच्या जावयाला कुलाब्याचे तिकीट

मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुलाब्यात विद्यमान आमदाराचे तिकीट कापत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जावयाला तिकीट देण्यात आले आहे. … Read more

भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

विशेष प्रतिनिधी । राहुल दळवी भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधानसभेच्या उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली. या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. जाहीर केलेल्या यादीत शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं … Read more

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला पक्ष तिकीट देणार नाही असा गौप्यस्फोट केला आहे. पक्षाने आपल्याला विचारले होते की तुम्हाला सोडून कोणाला तिकीट द्यायचे तुम्ही सांगाल त्याला आम्ही तिकीट देऊ असे खडसे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने त्यांचे कार्यकर्त्ये अत्यंत संतप्त झाले आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या … Read more

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी … Read more

एकनाथ खडसेंच्या उमेदवारीवर गिरीश महाजन म्हणतात

जळगाव प्रतिनिधी |  भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील नाही. त्यामुळे खडसेंपुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या बद्दल सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या पारंपरिक जामनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more