हिंदुत्व सहिष्णू, म्हणूनच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही; देवेंद्र फडणवीसांची धमकी की इशारा?

नागपूर । ‘हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते,’ असे वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व … Read more

केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही? संजय राऊतांचा पलटवार

मुंबई । ‘वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला … Read more

‘गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभारही तुम्ही सांभाळता, तेथील मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं का?’- बाळासाहेब थोरात

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वाद मिटताना दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत (balasaheb thorat) यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न … Read more

‘देव भूमीतून आलेल्या राज्यपालांकडून तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज’, शेलारांनी शेलकी टीका

ashish shelar uddhav thakarey

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत शब्दात राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहिलं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात … Read more

‘राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वनिष्ठतेबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं’; ओवैसींचा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता या वादात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. ज्या राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली. त्यांनी असं वक्तव्य … Read more

‘उद्धवजी तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का?’ राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारणा

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी … Read more

बाबरी मस्जिद जादूने पडली काय? देशासाठी आज काळा दिवस – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी काळा दिवस आहे. बाबरी मस्जिद सदर आरोपींनी पडली नाही तर मग काय जादूने मस्जिद पडली काय असा सवालही ओवेसी यांनी लगावला आहे. बाबरी मस्जिद विद्वंसचे मूळ … Read more

करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजप नेत्याचा अजब सल्ला

कोलकाता । कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. अनेक मोठे शास्त्रज्ञ कोरोनावर वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी एक अजब सल्ला दिला आहे. गोमूत्राचे महत्व सांगत असताना दिलीप घोष यांनी लोकांना करोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक … Read more

नेपाळमध्ये खरी अयोध्या असल्याचा नेपाळी पंतप्रधानांचा दावा; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे असा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला. भगवान राम हे भारताचे नसून नेपाळचे असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे. केपी शर्मा ओली म्हणाले की, नेपाळमध्ये भारताने सांस्कृतिक अतिक्रमण केले आहे आणि आपल्या इथे बनावट अयोध्या तयार केली आहे. नेपाळी माध्यमांनी ओलीच्या हवाल्याने म्हटले … Read more

वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु … Read more