गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचे ‘हे’ घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी नेले अन्…

hingoli crime

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ याठिकाणी वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरने त्याच्याकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे केले. यानंतर पीडित महिलेने याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले. … Read more

अनैतिक संबंधातुन तरुणाची दगडाने ठेचून हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीविरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काय आहे नेमके प्रकरण ? सचिन … Read more

नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

BJP Flag

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक … Read more

बंदूक घेऊन बँकेत आले, फायर केली..तरी कर्मचार्‍यांनी पैसे चोरट्यांना दिले नाहीत (Video)

औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा जवळील चोंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक तीन चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता लुटण्याचा प्रयत्न केला. पंरतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद दिली नसल्याने चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरट्यांनी बँकेच्या काचेवर दोन राऊंड फायर केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. काच फुटल्याने रोखपाल जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. … Read more

वर्षभरात मराठवाड्यात 887 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत र्षभरात 887 शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्या बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. यापैकी 681 शेतकर्‍यांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. … Read more

पती-पत्नीने एकाच झाडाला गळफास घेत संपविले जीवन

औरंगाबाद – शेतातील लिंबाच्या झाडाला पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात उघकीस आली आहे. रामदास (25) आणि शीतल इंगळे (20) अशी मृतांची नावे असून ते वाघजाळी येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, वाघजाळी येथे रामदास आपली … Read more

सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसला अपघात, 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात 15 कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जखमींना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर (छत्तीसगड) हून सुमारे 60 कामगार … Read more

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; चार ठार तर 24 जखमी

accident

औरंगाबाद – हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोडजवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर व बसच्या विचित्र अपघातात चार जण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, एम एच 38 … Read more

प्रशासनाचा अजब कारभार ! मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये लसीकरण मोहीमेसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सेनगावच्या तहसीलदाराने चक्क कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉममुळे केंद्र व राज्य सरकारकडून या नव्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपायोजना करण्याकरीता कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव होत असल्यामुळे … Read more

संतापजनक ! सेक्ससाठी नकार दिल्याने पतीने पत्नीला दिल्या जिवंतपणी नरकयातना

rape

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून हिंगोलीतील एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत अमानुष कृत्य केलं आहे. या नराधम पतीने पीडितेला सिगरेटचे चटके दिले तसेच तिला अँटीसेप्टीक लिक्विडसुद्धा पाजले. यानंतर आरोपी पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय पीडित महिलेने मुंबईतील … Read more