शिवसेनेसोबत एकत्र एकत्र येण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांतदादांचा यु-टर्न, म्हणाले..

पुणे । राज्यातील जनतेच्या हितासाठी आजही आपण शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी … Read more

शिवसेनेसोबत एकत्र येण्याच्या चंद्रकांतदादांच्या विधानाची फाडणवीसांनी काढली हवा, म्हणाले..

मुंबई । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यावरून चर्चांना ऊत येतो. असाच काहीसा भाजपमधील विसंवादाचे दर्शन घडवणारा प्रकार आज घडला. ‘राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. … Read more

शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र यायला तयार, मात्र..; चंद्रकांतदादांनी दिली युतीच्या चर्चांना हवा

मुंबई । राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही, तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असं सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी शिवसेना-भाजप(shivsena-bjp) युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. पाटील यांचं हे वक्तव्य आल्यानंतर तर्कवितर्क वर्तविले जात असून भाजपने आता नमती भूमिका घेतल्याचं जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

चंद्रकांतदादा मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे राणेंना विचारा; शिवसेना नेत्याची टीका

कोल्हापूर । मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा कसा शेवट होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. ते सोमवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले कि, … Read more

जिगरबाज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस

महाराष्ट्राचे जिगरबाज आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वयाची ६० वर्षं पूर्ण केली आहेत. कोरोना संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

उर्जामंत्री नितीन राऊतांना बसला शॉक; वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द

मुंबई । राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नितीन राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नितीन राऊत यांनी परस्पर या बदल्या केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही नाराज होते. या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर काही वेळातच … Read more

शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंची दिल की बात! राजकारण ढवळून निघणार?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलीकडे घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. त्यानंतर आता सामनाने आपला मोर्चा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे ओळवला असून उध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत संजय राऊत यांनी सामना साठी घेतली आहे. … Read more

कोरोना संकटात महाराष्ट्राचा हक्काचा निधी केंद्राकडून दिला जात नाहिये – शंभुराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कोरोनाचे महाराष्ट्रावर मोठे संकट असतानाही इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. राज्याच्या हक्काचा निधीही दिला जात नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी पैसे मिळत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची संयुक्तीत पत्रकार परिषदेत झाली. … Read more

मुख्यमंत्री वाढवणार का संचारबंदी? 

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या १० लाख ३८ हजारहून अधिक झाली आहे. राज्यातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री संचारबंदी वाढवणार का असे प्रश्न उभे राहत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संचारबंदी  वाढवण्यासाठी अनुकूल आहेत असे एकूण दिसत आहे. विविध महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी केली आहे. त्याचा हेतू मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे जास्तीत … Read more

शिवसेना खासदाराच्या मुलाची पावसात भिजत काम करणार्‍या पोलिसाला शिवीगाळ? पहा व्हिडिओ

मुंबई । देशात कोरोना महामारीच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचारी बंदोबस्त करत आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. राज्यातील अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत मात्र यातून बरे  पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र या पोलिसांनाच शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला आहे. आणि  शिवसेना खासदाराच्या मुलाकडून हा प्रकार घडला आहे. निलेश राणे यांनी … Read more