खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे.आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहिरात … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई, शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.

राज्यात दिवसभरात सापडले ७ हजार ८६२ नवे कोरोनाग्रस्त; २२६ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज ७ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. पैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजतागायत राज्यातील  ९ हजार ८९३ रुग्णांचा … Read more

राज्यात आज दिवसभरात सापडले ६ हजार ६०३ नवे कोरोनाग्रस्त; १९८ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज दिवसभरात ६,६०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यातील १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या आज २ लाख २३ हजार ७२४ इतकी झाली आहे. तर राज्यातील रमुन मृतांची संख्या ९ हजार ४४८ झाली आहे. राज्यसरकारने आज संचारबंदीच्या शिथिल केलेल्या नियमांमध्ये सुरु करण्यात आलेल्या दुकानांच्या वेळेत २ तासांची … Read more

राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या २ दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये … Read more

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी ९ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. विनाकारण बाहेर फिरु … Read more

राज्यात दिवसभरात सापडले 4 हजार 841 नवे कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1 लाख 47 हजार वर

मुंबई | राज्यात आज 4841 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली … Read more

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर … Read more

राज्यातील कंटेन्मेंट झोनबाबत राजेश टोपेंनी केंद्राला केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये अंदाजे १ कोटी लोक अडकून आहेत. शिवाय यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मोठा भार पडत आहे. प्रशासन आणि पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी केली. राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करा, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

मुंबई । मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल सेवा) सुरू करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. काल राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव … Read more