पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात … Read more

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झगडत असलेले तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. बलबीर यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुशबीर आणि तीन मुले कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंग यांनी प्रेस ट्रस्टला सांगितले की,” सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. … Read more

गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे . मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील … Read more

दाट रहिवाशी वस्तीत कोसळलं पाकिस्तानी प्रवासी विमान; कराची जवळील घटना

वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विमान कोसळले असता धुराचे लोट सर्वदूर पसरल्याचे दिसून आले. कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या … Read more

बिहारमध्ये झालेल्या बस-ट्रकच्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l मजुरांच्या अपघातांचे सत्र सुरू असताना त्यात पुन्हा एका अपघाताची भर पडली आहे. बिहारमध्ये असणाऱ्या बागलपूर येथे झालेल्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात अनेक मजूर हे जखमी झाले आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व अपघातात जखमी … Read more

चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या … Read more

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर … Read more

धक्कादायक! मशरुम खाल्ल्याने ६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मेघालयातील पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यातील दुर्गम गावात सहा लोकांचा मृत्यू झालेल्या विषारी मशरूमची ओळख अमानिता फेलो म्हणून झाली आहे. शनिवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की याला सामान्यतः ‘डेथ कॅप’ मशरूम म्हणतात. गेल्या महिन्यात, अमलरेम नागरी उपविभागामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवळील लमीन गावच्या सहा जणांचा मशरूम खाऊन मृत्यू झाला होता.त्यांनी ते जवळच्याच जंगलातून तोडून … Read more

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more