खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

शेतकर्‍यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ लॉकडाऊनमधून शेतीशी संबंधित कामांना सूट दिल्यानंतरही वाहतूक व्यवस्था ही शेतकर्‍यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी धान्य किंवा भाजीपाल्याची वाहतूकच होत नाही आहे.अनेक राज्यांत एकीकडे भाजीपाला शेतीतच सडलाय तर दुसरीकडे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना महागड्या दराने मिळतोय.ही समस्या सोडविण्यासाठी मोदी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यांमधील शेतमालाच्या वाहतुकीची … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली. मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.

राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर तीन महिन्यांत सातबारा कोरा करणार – अजित पवार

युती शासनाने शेतकऱ्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असून सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

कोथिंबिरीच्या विक्रीतून तब्बल १७ लाखाचा नफा

निफाड प्रतिनिधी | बाजारात मिळणाऱ्या दारावर शेतमालाचे भवितव्य अवलंबून असते असे म्हणतात त्याचाच प्रत्येय नाशिक जिल्ह्यात आला आहे. निफाड तालुक्यातल्या कोकणागाव येथील आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरमध्ये कोथिंबीर लावली होती आता कोथिंबीर महाग असल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातली कोथिंबीर बांधवरच १७ लाखात विकत घेतली. भाज्यांना चव आणणारी आणि मसाल्यांच्या पदार्थांना पाचक बनवणारी बहुगुणी कोथिंबीर … Read more

धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल? या गावातील शेतकर्‍यांची मागणी

बीड प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पूस गावांतील शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केली असल्याचा दावा शेतकरी करत आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्याचे सहकुटुंब धरणे आंदोलन … Read more

टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव, क्रेटला एवढी मोठी किंमत

जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व … Read more

उपचार वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु

मायणी प्रतिनिधी | महेश जाधव अनफळे तालुका खटाव येथील मारुती राम आडके वय ७० रा अनफळे यांचा शनिवारी सायंकाळी ८:३० वाजण्यासुमारास सर्पदंशाने मृत्यु झाला असल्याची घटना घडली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.त्यामुळे नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच वैद्यकीय अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, घरातील कर्ता माणूस दगावल्याने होणारी नुकसान भरपाई … Read more

सडावाघापूर पठारावर विषबाधेमुळे आठ जनावरांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सडावाघापूर पठारावरील माऊली मंदीर परिसरात उघड्यावर टाकलेले शिजविलेले शिळे अन्न (भात) खाल्ल्याने 5 शेतकऱ्यांच्या 4 गाभण म्हैशी व 3 गाभण गायींचा मृत्यू झाल्याने पठारावर एकच खळबळ माजली आहे. तर आणखी 4 म्हैशींची प्रकृती पूर्णपणे खालावली असल्याने त्यांच्यावरही पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे … Read more