ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे मिलिंद इंगळे होय. मिलिंद इंगळे यांना मी महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण … Read more

आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

चीनने पाठवलेल्या ‘बोगस’ रॅपिड टेस्ट किट भारत परत करणार- केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली । चीनकडून आयात करण्यात आलेल्या ‘रॅपिड टेस्टिंग किट’ चुकीचा निकाल देत असल्यानं अशा बोगस किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्यानं सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी राज्यांच्या संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन … Read more

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारा पार; गेल्या २४ तासात १६८४ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात गेल्या २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे … Read more

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यात 49 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च पासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत किती पोलिसांना कोरोनाची लागण झाली याची आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 11 पोलीस अधिकारी व 38 पोलिसांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे. राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी … Read more

चीनमधून मधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा; आयसीएमआरची राज्यांना सूचना

नवी दिल्ली । चीनमधून आयात केलेल्या राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २ दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआर(Indian council of medical research)चे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. … Read more

धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात … Read more

राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनच्या निकषात बदल- आरोग्यमंत्री

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण … Read more

राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाची एंट्री; जवळपास 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन

नवी दिल्ली । देशभरात हैदोस घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता राष्ट्रपती भवनाच्या दारात पाऊल ठेवलं आहे. राष्ट्रपती भवन परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर या परिसरातील जवळपास 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन करण्यात आली आहेत. राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कुटुंब राहतं, तिथे मात्र कोरोनाचा कुठलाही धोका … Read more