यांचं करायचं काय …? पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीत गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

पुणे | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात कालपासून (14एप्रिल ) पासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यात जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आलेली आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा समावेश हा जीवनावश्यक वस्तू मध्ये होतो. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना नियमानुसार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्याच्या कृषी … Read more

राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? : महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलीय. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरने स्वतःच सुरू केले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल; कोविडसाठीही सुरू केला होता स्पेशल वॉर्ड

शिरूर | एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरनेच एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकूण 22 बेडचे असून गेल्या दोन वर्षापासून ते सुरू आहे. कंपाऊंडरने बोगस नाव आणि बनावट पदवी तयार करून हे हॉस्पिटल बांधले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे हॉस्पिटल … Read more

राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना

rains

पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. … Read more

नियम पाळून व समन्वय ठेऊन बाजारसमित्या सुरु ठेवा : सतीश सोनी

पुणे | अन्नधान्य,फळे, भाजीपाला यांची गगना अत्यावश्यक सेवांमध्ये होते. त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरू करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी सोमवारी (12एप्रिल)दिले. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. या आदेशात सोनी यांनी म्हटलं आहे की, ” कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील … Read more

ब्रेक द चेन म्हणणाऱ्यांनो चेक यूवर ब्रेन ः तृप्ती देसाई

पुणे | महाराष्ट्रात कोरोना राैद्ररूप धारण करत आहे. रेमडिसिविर इंजेक्शन ५० वेळा फोन करून मिळत नाही. इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना का पकडले जात नाही. राज्य सरकार म्हणते ब्रेक द चेन मला त्यांना सांगायचे आहे चेक यूवर ब्रेन असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या कोरोना बाधितांना रेमडिसिविर … Read more

पुणे जिल्ह्यात तात्काळ लसींचा पुरवठा करा : सुप्रिया सुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसींचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यात तब्बल १०९ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेत अडथळा येत आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने तातडीने पुणे जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया … Read more

पुढील ४८ तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या ४८ तासात विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं काही मिनिटांपूर्वीच दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी … Read more

Big Breaking News : कोरोना संकटातून वाचण्यासाठी आता पुण्यात घेतली जाणार लष्कराची मदत

Indian Army Recruetment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे. पुणे महानगर पालिकेने … Read more