पुण्यातून कोरोना लसीचा पहिला डोस रवाना, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने आजपासून आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस रवाना करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more