बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं असतं ; सदाभाऊ खोत यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरू झाल्या तरी काही ठिकाणी अद्याप एसटी बसेस सुरू नसल्याने शाळेतील मुलांना पाणी चालत जावे लागत आहे. यावरून माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यांची तर शाळाचं … Read more

पश्चिम महाराष्ट्रात 20 वर्षापासून शाळांना टार्गेट करणारा आरोपी गजाआड, 28 चोऱ्यांची कबुली

Crime

कराड | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिह्यातील शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्यास कराड पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा अटक केली. तीन जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शेखर शेकाप्पा पुजारी (वय- 62, रा. जवाहरनगर खार ईस्ट, मुंबई) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस गुरूवारी … Read more

राज्यात ओमिक्रॉनचे संकट : शाळा सुरु होण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी दिली “ही” महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या हि 8 वर गेली आहे. अशात मुंबई आणि पुणे या ठिकाणी शाळा सुरु होणार का? असा प्रश्न पालकाना पडला असून शाळा सुरु होण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

महात्मा गांधी विद्यालय कालेच्या नूतन इमारतीसाठी भरीव योगदान देणार; मा.प्रा.डॉ.मोहन राजमाने यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काले गावातील महात्मा गांधी विद्यालय काले चा नूतन इमारतीसाठी भरीव योगदान देणार अशी ग्वाही सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय,कराड चे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी दिली आहे. मोहन राजमाने (सर) यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने गुणवंत प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल म.गां विद्यालय काले व म.गां विद्यालय माजी विद्यार्थी सेवा संघ काले यांच्या वतीने … Read more

मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी … Read more

शाळा 1 डिसेंबर पासून सुरू; सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि … Read more

पहिली ते चौथी शाळा सुरू होणार?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा … Read more

आजपासून शाळा सुरू; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक … Read more

शाळांच्या फी वाढीसंदर्भात तुर्त कारवाई करु नका; औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शासनाने इंग्रजी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने याचिका विरुद्ध तूर्तास कारवाई करू नये, तसेच थकित फी भरू शकत नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये. त्यांना परीक्षा देण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लड्डा यांनी … Read more

शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षकांकडून #आताशाळासुरुकरा ट्रेंड

औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम … Read more